महत्त्वाच्या बातम्या, आजच्या टॉप मराठी हेडलाईन्स

पावसाळ्यात ना खराब होणार ना बुरशी लागणार; सोप्या ४ ट्रिक्स वापरा, वर्षभर टिकेल लोणचं

0

लोणचं हा भारतीय खाद्यपदार्थाचा महत्त्वाचा भाग आहे. जेवणासोबत थोडं लोणचं संपूर्ण जेवणाची चव वाढवतं. भारतीय घरांमध्ये, अधूनमधून भाजी नसेल तर लोणची पराठ्यासोबत किंवा साध्या चपातीसोबत खातात. (How to store pickles) एकदाच जास्त लोणचं बनवल्यास नंतर ते बराच काळ वापरता येईल. परंतु ते योग्यरित्या साठवणे महत्वाचे आहे. विशेषत: पावसाळ्यात सततच्या पावसामुळे वातावरण ओलसर राहते आणि आपली एक छोटीशी चूक लोणचे खराब करू शकते.

काही वेळा ओल्या हातानं बरणीला स्पर्श केल्यानं लोणचे खराब होऊन त्यात बुरशी येऊ लागते. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची ही समस्याही दूर होऊ शकते. जर तुम्हाला लोणचे योग्यरित्या कसे साठवायच्या टिप्स माहीत असतील तर लोणचे खराब होणार नाही.

1) काचेच्या बरणीत लोणचं भरा (Which jar is good to store pickles?)

तुम्ही लोणचं बनवून कधीच प्लास्टीकच्या बरणीत भरू नका. लोणचे काचेच्या बरणीत ठेवावे. लोणचे प्लॅस्टिक किंवा इतर धातूवर प्रतिक्रिया देऊन कडू होतात. म्हणून नेहमीच काचेच्या बरणीत ठेवा.

2) लोणचात तेल मीठ घाला

बरेच लोक कमी तेलात लोणचे बनवतात, कारण त्यांना वाटते की जास्त तेल आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण  तेल आणि मीठ एक प्रकारे संरक्षक म्हणून काम करतात. लोणच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह नसतील तर लोणचे कोरडे होऊन खराब होते. यामुळे लोणच्यामध्ये भरपूर तेल टाकावे.

3) बरणीच्या झाकणाला कागद किंवा कापड गुंडाळा

ओलाव्यामुळे बरण्या खराब होतात. कधी कधी लोणच्याच्या घट्ट डब्यातही ओलावा येतो. त्यामुळे तुमच्या लोणच्याच्या डब्याचे झाकण घट्ट बंद असल्याची खात्री करा. जर तुम्हाला वाटत असेल की ओलावा तुमचे लोणचे खराब करेल, तर झाकण कागद किंवा कापडाने बंद करा. झाकण लावण्यापूर्वी, वर स्वच्छ कागद किंवा कापडाचा तुकडा ठेवा आणि नंतर ते लावा.

4) लोणचं काढताना स्वच्छ चमचा वापरा

आपल्यापैकी बरेच जण लोणच्यामध्ये चमचा  घातल्यानंतर काढायला विसरतात. असे केल्यानेही लोणचे खराब होते.  तुमचा चमचा स्टीलचा असेल तर त्यामुळे लोणचे खराब होऊ शकते. त्याच वेळी, जेव्हा तुम्ही लोणचे बाहेर काढाल तेव्हा नेहमी स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरा.  स्वच्छ हाताने आणि चमच्याने लोणचे काढून घ्या. जेव्हा संधी मिळेल आणि चांगला सूर्यप्रकाश असेल तेव्हा लोणचाची बरणी एकदा उन्हात ठेवावी. यामुळे लोणचं जास्त काळ टिकेल. 

Leave A Reply

Your email address will not be published.